आम्हाला पूर्वीपासून पुण्यातल्या हिरवाईचे कोण कौतुक.
कॉलेज मधे असताना सिंहगड रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, युनिवेर्सिटी रस्त्यावर दुतर्फा मोठ मोठे वृक्ष म्हणजे एक झकास अनुभव असे. भर उन्हाळ्यात देखिल सुर्याची किरणे रस्त्यापर्यंत पोचत नसत. आज थेट बाणेर, हिन्जेवाड़ी, उरुलिकांचन पर्यंतची सगळी झाडे झपाट्याने कापून टाकली गेली आहेत....अन तेही फ़क्त १५ वर्षात.
आपल्याला रहायला घरे हवीत, रस्ते, मैदाने हवीत...मग झाडे कुणाला हवी आहेत?
वडाची, आपट्याची, बाभूळ, पलाश, साग, सालाची ही अस्सल भारतीय झाडे पहायलाही मिळत नाहीत.
पाखरे, वाटसरू, फुलपाखरे यांना हक्काचा निवारा देणारी शहरांची फुफ्फ्से आपण सहज संपवून टाकली.
पर्यावरणाचा समतोल, जैविक चक्र आणि निसर्गाचे देणे सोडा....आपल्याच पुढच्या समाजाला आपण काय देणार आहोत?
तुटत असलेले प्रत्येक झाड का तुटत आहे? ते कोण तोडत आहे? हे आपण का विचारत नाही?
घराच्या बाल्कनीत चार भरपूर पाणी पिणारी रोपे लावली की आपली जबाबदारी संपली का?
महादेवाला बेल, गणपतीला पत्री अन सोने म्हणून आपट्याची झाडे तोडणारे आपण....
कधी जागे होणार आहोत?
तोडले जाणारे प्रत्येक झाड ही आपली स्वतः ची नैतिक जबाबदारी नाही का?
आजपासून अश्या दुर्दैवी झाडांचे फोटो आमच्याकडे पाठवायला विसरू नका..... न विसरता...
आपण निदान हे तर करू शकतोच...हो ना?

No comments:
Post a Comment