some pictures of how brutally trees are being killed in Pune.
मुकी बिचारी कुणीही मारा
सुसंस्कृत, विचारी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात उत्तम वाढलेल्या अनेक झाडांच्या निर्मम हत्या करण्यात येत आहेत.
यासाठी अनेक नवनव्या पद्धती वापरल्या जात आहेत.
झाडाची साल गोलाकार कापणे, बुन्ध्यावर रसायने टाकणे, फांद्या कापणे असे प्रकार सर्रास दिसत आहेत.
कर्वेनगर , कोथरुड परिसरातील पूर्ण वाढ झालेली अनेक झाडे गेल्या काही दिवसात अश्याप्रकारे मारली गेली आहेत.
स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बियोंड होरायझंस हेल्थ एंड सोशल सर्कल' ('भास्') या संघटनेचे संस्थापक डॉ. अतुल राक्षे यांनी पाठवलेली छायाचित्रे यासंदर्भात पुरेशी बोलकी आहेत.
महानगरपालिका प्रशासन, उद्यान विभाग, नागरीक यांनी वेळीच प्रयत्न करून हे प्रकार लगेच रोखायला हवेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात 'भास्' मार्फ़त फेसबुक वर एक नवीन मोहीम आणि एक ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.
अशी छायाचित्रे http://maazebhhas.blogspot.com/ या लिंक वर ब्लॉग साठी आणि http://www.causes.com/causes/397426-support-bhhas?recruiter_id=९८४३१७३१ या लिंक वर फेस बुक साठी पुण्यातील नागरीक आणि युवा वर्गाने पाठवावित असे आवाहन भास् च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment