अपघातात हात पाय गमावलेली, मृत्युमुखी पडलेली माणसे पाह्यली की आपण अस्वस्थ होतो.
घात पात करून तोडून कापून टाकलेल्या झाडांचे ना कुणाला सोयर ना सूतक.
पण तरीही काही आशेचे किरण डोकावतात अधून मधून.
आमचा एक मित्र आहे. विनोद जैन.
या गृहस्थाने एकट्याने विविध सरकारी संस्था च्या विरोधात कोर्टात केसेस केल्या आहेत.
एकटाच लढतो आहे पट्ठा.
माहिती अधिकाराखाली त्याने दिलेली ही काही माहीती वाचा.....
१) दिनांक १/४/२०१० ते २४/१/2011 या कालावधीत वृक्षान्चा विस्तार कमी करण्यासाठी पुणे पालिकेच्या उद्यान विभागाने म. न. पा. हद्दीतील एकूण ३०७९ परवानग्या दिल्या आहेत. (प्रत्येक परवानगी एकाच झाड़ासाठी आहे असे नव्हे!)
२) उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेला झाड तोड्न्याची परवानगी देता येत नाही.
३) वृक्ष गणना दर ५ वर्षांनी करणे बंधनकारक असताना पुण्यात गेल्या १० वर्षात अशी गणना झालेली नाही.
४) पालिकेच्या झाडांवर क्रमांक नाहीत.
५) भारतीय झाडे लावावीत असे स्पष्ट निर्देश असताना अजुनही विदेशी झाडे लावली जात आहेत.
No comments:
Post a Comment