आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

5 Dec 2011




जेव्हा तू म्हणालास,
 मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..', मीही तसंच वागायचं ठरवलं.
तू म्हणायचास,' पल भर के लिये कोई हमें प्यार कर ले..झूठा ही सही.. ', मला अगदी तसंच वाटायचं!
जेंव्हा तू तिरका तिरका पळत रात्रीच्या गुडूप अंधारात धुंद होत म्हणत राह्यलास, '...किसीके तो हो जाओ',
मी मग अगदी तसाच वागलो.
तू म्हणालास, 'दिन ढल जाये हाये रात ना जाय', अन म्हणालास, 'कौन रोता ही किसी और कि खातीर ए दोस्त'..मला किती खरखुरं उदास वाटलं मग...
तू म्हणालास, 'प्यार का राग सुनो', आम्ही ऐकत राह्यलो मन लावून..
तू म्हणालास,'अपनी तो हर आह एक तूफान है' अन म्हणालास,'देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना'.. मला अगदी असाच लटका राग यायचा त्यानंतर किती दिवस...अन अशीच मस्करी करायचो.
'हम बेखुदी मी तुमको पुकारे चाले गये' ची बेखुदी, तुझ्या केसांचा कोंबडा, तुझी टिपिकल अदा...
मी म्हणालो, 'के दिल अभी भरा नही...'
अन तू गेलास निघून..शेवटची भेट सुद्धा न घेता..
....
तुझा..
अतुल

No comments:

Post a Comment