आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

22 Feb 2012


पौगंडावस्थेतच रचला जातो पुढील स्त्री जीवनाचा पाया !- डॉ.सारिका राक्षे .
पुणे दि.१७/०२/२०१२
पौगांडावस्था ही प्रत्येक स्त्रिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची पायरी आहे . वय वर्षे १० ते १६ या वायो गटातील सर्व मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आहार, वागणे आणि जीवनशैली याबाबत विशेष जागरूक असायला हवे.
असे प्रतिपादन पुणे येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.सारिका राक्षे यांनी केले.
'बियोंड होरायझन्स हेल्थ अन्ड सोशल सर्कल' (भास), आणि 'एनलायटन', पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 'मुलगी वयात येताना ' या विषयावरील कार्यशाळेत त्या पुढे म्हणाल्या की, पोलीसिस्टिक ओव्ह्यारीयन डीसीज , रक्ताल्पता, आणि पाळीतील अनियमितता अशी लक्षणे हल्ली मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत.कालांतराने उद्भवणाऱ्यावंध्यत्वासारख्या बिकट समस्या टाळण्या साठी या वयातच विशेष प्रयत्न करायला हवेत
डॉ.विकास चोथे यांनी पाळीच्या वेळची स्वच्छता आणि आहार याबाबत विशेष मार्गदर्शन केले.तर डॉ.कौस्तुभ घोडके व डॉ.सुप्रिया शहा यांनी यावेळी 'पारोची गोष्ट' या स्लाईड शोद्वारे नुकत्याच वयात येणाऱ्या मुलींच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात दिली.
या कार्यशाळेत संस्थेतील चौदाशे मुलींना मासिक पाळी सुरु होताना शरीरात घडणाऱ्या बदलांची माहिती देण्यात आली. यावेळी 'भास'चे संस्थापक डॉ.अतुल राक्षे आणि 'एनलायटनचे' अध्यक्ष श्री.संदीप भडकमकर उपस्थित होते.
जागतिक महिला दिनाला अनुलक्षून स्त्रीपणाच्या जाणीव अधिक समृद्ध होण्यासाठी या मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत .अधिक माहिती करिता खालील क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन डॉ राक्षेंनी केले.
९४२२०३४५०६ ,९९२२९१६०२५,,८०८७१६४९६१.

No comments:

Post a Comment