आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

14 May 2012

International Ayurveda Association: 1st International Vagbhata-Day celebrations: 13th International Ayuveda Conference on Evidance based Ayurveda, Pune, India: Dr. Atul Rakshe

" आचार्य वाग्भट यांचे प्राचीन वैद्यक तत्वज्ञान आजही मोलाचे "- डॉ. कुलकर्णी

पुणे येथे पहिला आंतर राष्ट्रीय 'वाग्भट दिवस' साजरा

पुणे दिनांक २६ एप्रिल २०१२
...
' सुमारे २००० वर्षांपूर्वी आचार्य वाग्भट यांनी वर्णन केलेल्या तत्त्वांनुसारच आजही जगभरात आयुर्वेद उपचार केले जातात. येणाऱ्या पिढ्या निरोगी होण्यासाठी आणि आजच्या नव्या आजारांचा सामना करण्यासाठी हे तत्वज्ञान मोलाचे आहे.' असे प्रतिपादन ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉ. पां. ह. कुलकर्णी यांनी केले.

वाग्भट नावाच्या प्राचीन आयुर्वेद शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ 'वाग्भट दिवस' आयोजित करण्यात आला. या निमित्ताने आयोजित 'एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद' या विषयावरील१३ व्या जागतिक आयुर्वेद परिषदेत ते बोलत होते.

'बृहदत्रयी' म्हणजेच आयुर्वेदातील सर्वात महत्वाचे तीन ग्रंथ.

त्यापैकी असलेल्या वाग्भट यांच्या अष्टांग हृदय आणि अष्टांगसंग्रह या ग्रंथांतील वर्नानानुसारच आजही व्याधींवर उपचार केले जातात.

पुणे येथे आयोजित 'वाग्भट दिवस' आयुर्वेदाच्या आधुनिक इतिहासात प्रथमच साजरा केला गेला.

परिषदेस वैद्य खडीवाले, डॉ. अरविंद संगमनेरकर, डॉ. सुभाष रानडे यांचेसह विविध ठिकाणांहून आलेले २०० आयुर्वेद अभ्यासक उपस्थित होते.

आयुर्वेद क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्यांचे पुरस्कार देवून सन्मान करण्यात आले.

हॉलंड येथील वैद्य ईटीयन प्रेमदानी, इटली येथील डॉ. अन्जेला सांझ, केरळ येथील वैद्य. धर्मपालन, बंगलोर येथील डॉ. बी. आर. ललिता आणि पुण्यातील डॉ. विजय जाधव, डॉ. एच. जे. मुजुमदार आणि डॉ. मनीष पटवर्धन हे आंतरराष्ट्रीय 'आयुर्वेद भूषण' पुरस्काराचे मानकरी ठरले. डॉ. प्रकाश जाधव यांना 'माएस्त्रो दि आयुर्वेद' या विशेष पदव्युत्तर सन्मानाने गौरविण्यात आले.

आरोग्यशास्त्राच्या नव्या विद्यार्थ्यांना आणि जगभरातील जिज्ञासूंना 'वाग्भट' आणि आयुर्वेदाच्या महान शास्त्र परंपरेची ओळख व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. चरकसंहिता आणि सुश्रुत संहिता यांवर आधारीत परिषदा अनुक्रमे जुलै आणि नोव्हेंबर २०१२ मध्ये आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अतुल राक्षे यांनी यावेळी दिली.

यावेळी 'दीर्घायू' या आंतरराष्ट्रीय त्रैमासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुधाकर जोशी, डॉ. जयंत बर्डे, श्री बी.डी. उन्हाळे, डॉ. पां. ह. कुलकर्णी आणि डॉ. अतुल राक्षे उपस्थित होते.

परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा बोथरे यांनी आणि संयोजन डॉ. कौस्तुभ घोडके, डॉ. हर्षद मोहरे, डॉ. मजहर सय्यद आदींनी केले.

अधिक माहितीसाठी:

डॉ. अतुल राक्षे
९४२२०३४५०६


छायाचित्र: 'दीर्घायू' या आंतरराष्ट्रीय त्रैमासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. सुधाकर जोशी, डॉ. जयंत बर्डे, श्री बी.डी. उन्हाळे, डॉ. पां. ह. कुलकर्णी आणि डॉ. अतुल राक्षे

No comments:

Post a Comment