‘आंतरराष्ट्रीय चरक संहिता दिवस '
'इंटरनेशनल आयुर्वेद असोसिएशन ' जगभरातील आयुर्वेदाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
या ' संस्थेमार्फत आयुर्वेदाच्या क्षेत्रात पहिल्यांदाच 'बृहदत्रयी' संहिताना समर्पित 'आंतरराष्ट्रीय परिषदांची मालिका' आयोजित केली जात आहे.
'बृहदत्रयी 'म्हणजे आयुर्वेदातील अत्यंत प्राचीन आणि आधारभूत असे तीन संहिता ग्रंथ.
यापैकी चरक संहितेस समर्पित 'आंतरराष्ट्रीय चरक संहिता दिवस' रविवार दि.२२/०७/२०१२ रोजी, मुळगावकर सभागृह, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंटरनेशनल ट्रेड सेंटर, सेनापती बापट रस्ता ,पुणे येथे साजरा करण्यात येणार आहे.
'चरकसंहिता' हा जागतिक वैद्यकक्षेत्राच्या इतिहासातील 'आद्य वैद्यक ग्रंथ’. आजही या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वांचा वापर करून जगभरात यशस्वी उपचार केले जातात.
अशा प्रकारच्या स्मृतिदिनाचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले असून यावेळी असोसिएशनचे संस्थापक प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी यांच्यासह अनेक आयुर्वेद तज्ञ उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी संशोधनात्मक कार्यास प्रोत्साहन देणाऱ्या ' एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद' या विषयावरील आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे (14th International
Conference on Evidence based Ayurveda) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये आयुर्वेदातील तज्ञ त्यांच्या संशोधनात्मक कामाचे प्रबंध सादर करतील.
या प्रसंगी अत्यंत प्रतिष्ठेचे 'आंतरराष्ट्रीय आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार' , 'आंतरराष्ट्रीय आयुर्वेद भूषण पुरस्कार' आणि 'आंतरराष्ट्रीय चरकसंहिता जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच चरक संहिता अभ्यासकांना गौरविण्यात येणार आहे.
या मालेतील 'वाग्भटसंहितेस वाहिलेला 'आंतरराष्ट्रीय वाग्भट संहिता दिवस' दि.२६/०४/२०१२ रोजी पुणे येथे संपन्न झाला.
'आंतरराष्ट्रीय सुश्रुतसंहिता' दिवस रविवार दि.११/११/२०१२ रोजी पुणे. येथे साजरा करण्यात येणार आहे.
परिषदेमध्ये सहभागी होण्याकरिता डॉ.अतुल राक्षे (कार्यकारी अध्यक्ष ) - ९४२२०३४५०६ आणि डॉ.कौस्तुभ घोडके-वेदपाठक (सह-सचिव ) - ८०८७१६४९६१ यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment