आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

26 Dec 2011

'पश्चिमेत मला दिसलेलं जीवन आणि आयुर्वेद'

रविवार २५ डिसेंबर ला आय. ए. ए., दीर्घायु, भास आणि आय. आय. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कार्यक्रमात 'पश्चिमेत मला दिसलेलं जीवन आणि आयुर्वेद' या विषयावर बोललो.

त्यावेळी लिहिलेल्या या ओळी:
 


अशीच असतात माणसं तिथलीही
अशीच आनंदी-दु:खी-सृजनशील-कटकटी वगैरे

वरवर तिऱ्हाईत वाटणारी माती, रस्ते, झाडं...सारं 'आपलं' वाटू लागतं हळू हळू ...
एका झाडावरच्या पानांइतकेच एकमेकांचे असतो आपण
'या तिऱ्हाईत रस्त्यानं सरळ पुढं गेलं तर काय होईल ?'
या चिरंतन प्रश्नाची आवर्तनं रोज भेटत जातात..

'माझ्या असण्यानं' कुणीतरी सुखावतंय,
कुणालातरी हसवता येतंय मला,
अन कुणीतरी मागतंय माझ्याकडे काही - बाही
यातला आनंद असतोच खोलवर..

माणसं - अशीच आनंदी-दु:खी-सृजनशील-कटकटी वगैरे
या तिऱ्हाईत रस्त्यानं सरळ पुढं गेलं तरी असतंच काहीतरी आपलंसं..
खाणं, गाणं, वागणं, निदान 'वाटणं'...

तिथं काय अन इथं काय...
असतातच पसरलेले हर्ष विमर्षाचे - चांगल्या वाईटाचे ध्वनी...प्रतिध्वनी...अर्थ..अनर्थ

चालत राहतो मनापासून...
शीळ वाजत राहते आत कुठेतरी आपोआप...
कोण म्हणतं जगण्याला ब्याग्राउंड म्युझिक नसतं ?

चालण्याची मजा असतेच..
कुणीतरी टाळ्या वाजवतो,
कुणी गाणे गातो,
कुणी चालत राहतो नुसताच सोबत...

चालण्याची मजा असतेच.. शेवटपर्यंत

चालण्याचीच मजा असते शेवटपर्यंत.

No comments:

Post a Comment