आयुर्वेद Ayurveda

आयुर्वेद Ayurveda
- the legacy...the heritage...the art of happy and healthy being...

Ayurveda update: View BHHAS programs' list (Marathi)

Namaste.

"Welcome to Maaze Bhhas-my illusions.

I hope you all feel free to write anything you want to share.
I hope, we all create a better world-with words...
I hope we keep connected...to each other, to our selves!"

Dr.Atul

9 Apr 2016

Read article about Ayurveda's Contribution to world Health in today's marathi daily Dainik Punyanagari.
जागतिक आरोग्य आणि आयुर्वेदाचे योगदान

आयुर्वेदाचार्य अतुल राक्षे

गेल्या वीस वर्षांत असं नेमकं काय घडलं की, ज्याचा परिणाम सर्वसामान्य व्यक्तींच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात दिसू लागला आहे? लहान मूल असो की ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या व्याधींना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही व्याधींनी जखडले आहे. शरीराच्या मंदावलेल्या हालचाली, मेंदूला ताण नाही, हवा व पाणी यांचे वाढते प्रदूषण, हायब्रिड फळे व पालेभाज्या, भेसळयुक्त दूध व फळांचे रस या सर्वांचा परिणाम या ना त्या कारणाने आरोग्यावर होत असतो. या आजारांवर औषधांचा मारा करून तात्पुरत्या स्वरूपात फरक पडत असला तरी, तो कायमचा उपाय होत नाही. त्यामुळे औषधे घेतली तरी आजार वारंवार बळावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. असे का होते, याचे उत्तर आयुर्वेदात सापडते. 

तात्पुरत्या औषधांच्या तुलनेने व्यक्तीच्या आरोग्यावर आयुर्वेदिक औषधांचा परिणाम याबद्दल माहिती आणि संदेश आपल्या देशाबरोबरच जगभर पोहोचवण्याचा प्रयसाधारण वीस वर्षांपूर्वी ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य पांडुरंग हरी कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केला.''आयु:वेद, म्हणजेच आयुर्वेद, आयुष्याचा वेद. आयुर्वेदाचं खरं काम आरोग्याचे रक्षण करणे. आजारपणात औषधे देणे हे आयुर्वेदाचा भाग आहे, पण फक्त औषधे देऊन आयुर्वेद थांबत नाही. शरीराला झालेली व्याधी समूळ नष्ट करून, मनाची शुद्धी करण्याचा आयुर्वेदाचा उदात्त हेतू आहे.'' हा संदेश जगभर सर्वत्र पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. पां. ह. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पुणे विद्यापीठात आयुर्वेदाचे वेगवेगळे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. आयुर्वेदाचा स्वतंत्र विभाग सुरू झाला. यामुळे खूप मोठा वर्ग आयुर्वेद शिक्षणाकडे वळू लागला आहे. याच कालखंडात आयुर्वेदिक शास्त्राचा प्रसार आणि प्रचार करणारी फळी निर्माण झाली. त्यांनी आयुर्वेदाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी पुण्यात प्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमेलन आणि परिषदेचे आयोजन केले होते.

त्याच वेळी जागतिकीकरणाचे वारे जोमाने वाहू लागले होते. त्याचे काही चांगले परिणाम झाले आणि काही वाईटही. त्याच वेळी प्रा. कुलकर्णी आणि सहकार्‍यांनी वेगवेगळ्या देशांत जाऊन आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरुवात केली.प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. एकाच वेळी कुठे बर्फ, कुठे कडक उन्हाळा, कुठे पाऊस असे वेगवेगळे वातावरण असते. तेथील आहार व जीवनशैलीमध्ये खूप मोठा फरक असतो. यांना गृहीत धरूनच तेथील स्थानिक समस्या कोणत्या असतील, आजार कोणते असतील, या आजारांवर कोणत्या औषधांचा परिणाम होतो. याबद्दल संशोधन करून तेथील स्थानिक नागरिकांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आजच्या घडीला स्पेन, पोलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, लंडन व जगभरातील अनेक देशांना आयुर्वेदाचे महत्त्व पटल्यामुळे आयुर्वेदाचा स्वीकार केला आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात आहार आणि जीवनशैलीच्या संकल्पना रुजवण्याचे काम आयुर्वेदाने केले आहे. इटली, हॉलंड, पोतरुगाल, दक्षिण व उत्तर अमेरिका, जवळजवळ सर्वच ठिकाणी आयुर्वेदाच्या विविध संस्था स्थापन झाल्या आहेत. त्याअंतर्गत तेथे वर्षभर आहार, व्यायाम,सेमिनार अशा विविध स्वरूपात उपक्रम राबवले जातात. तसेच या संस्थांकडून तेथील नागरिकांसाठी आयुर्वेदाच्या संकल्पना प्रस्थापित करून त्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. आयुर्वेदाच्या साहित्यात भारतीय भाषेव्यतिरिक्त प्रत्येक देशाच्या स्थानिक भाषेत रूपांतर करण्याचा प्रयकेला जात आहे. 'चरकसंहिता, सुश्रुतसंहिता' अशा अनेक आयुर्वेदातील मूळ ग्रंथांचे भाषांतर त्या त्या देशातील पदार्थ, तसेच वातावरण लक्षात घेऊन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पदार्थ, आहार व वनस्पतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. काही देशांमध्ये हे काम पूर्णपणे झाले असून, काही ठिकाणी सुरू आहे. वंध्यत्व, मल्टिपल स्क्लेरॉसिस, अल्कोहोलिझम, सांध्यांचे दुखणे, लठ्ठपणा आणि वेगवेगळ्या अँलर्जी, तसेच अनेक आजारांवर उपचार देण्याच्या व्यवस्था स्थानिक पातळीवर परदेशामध्ये सुरू करण्यात आल्या आहेत.
आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देण्यासाठी इटलीमधील कोरिनाल्डो शहरात 'मधुर भारत महोत्सव' (डोल्चे इंडिया), तर हॉलंडमधील भारतीयांनी सुरू केलेली 'हमारा हिंदुस्थान' आणि दक्षिण आफ्रिकेत ट्राफ्सा या संस्थेतर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. इटलीमधील रिमीनी शहरात सिप्का नावाने आयुर्वेदिक शाळा सुरू करण्यात आली आहे, तर उत्तर अमेरिकेत माउंट मॅडोना इन्स्टिट्यूट आयुर्वेदाचा प्रसार करीत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तर आयुर्वेदाचे उपचार घेणार्‍या सर्व नागरिकांना विम्याचे संरक्षण बहाल केले आहे.

]आयुर्वेदाचा स्वीकार आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळजवळ सर्व देशांनी केला असला तरी भारतात म्हणावा तसा आयुर्वेदाचा प्रसार झालेला नाही.
आयुर्वेदाचे जे काम छोट्या शहरांत स्थानिक पातळीवर केले जात आहे, ते काम उपलब्ध आधुनिक यंत्रणेचा वापर करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले पाहिजे. सरकारी पातळीवर आयुर्वेदाची झालेली अनास्था दूर झाली पाहिजे. आयुर्वेदिक संस्थांचे देशात सबलीकरण होणे आवश्यक आहे. आयुर्वेद आता परदेशात पोहोचला आहे. प्रत्येक देशाच्या नियमानुसार तेथे निकष लावून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे आयुर्वेदाच्या औषधांचे आणि भारतीय वनस्पतींचे कॉपीराईट भारताकडे अबाधित राहिले पाहिजे, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न
करायला पाहिजेत. भारतात जागतिक दर्जाची प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे प्रसार, प्रचार, प्रशिक्षण आणि उपचार केंद्रांची स्थापना झाली पाहिजे. शालेय शिक्षणात इतर विषयांप्रमाणे प्राथमिक स्तरापासून आयुर्वेदाचे नियम, आहार यांचा समावेश झाला पाहिजे. आयुर्वेदिक औषधे आणि उपचार याबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचे काम सरकारी पातळीवर झाले पाहिजे.

No comments:

Post a Comment